झाडेगाव_शेगाव रस्त्याच्या ईरवा नालीत झाडांच्या फांद्या लटकल्यामुळे हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली

झाडेगाव_शेगाव रस्त्याच्या ईरवा नालीत झाडांच्या फांद्या लटकल्यामुळे हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
पीडब्ल्यूडी विभागाचा अर्थपूर्ण दुर्लक्ष
शेगाव तालुक्यातील झाडेगाव या गावच्या इर्वा नाल्यावर नागझरी ते डोंगरगाव पासून पावसाचे पाणी येत असल्यामुळे पाण्याचा बहाव जास्त आहे. रस्ता बांधणी वेळी ज्या ठिकाणी पूल हवा होता त्या ठिकाणी ठेकेदाराने गोल पाईपच्या साह्याने पाणी काढलं असल्यामुळे दरवर्षी या पाईपच्या नालीतून पावसाचे पाणी दाटते व पाणी पाईपच्या वरून सडक वरून फिरते. त्यामुळे हजारो एकर शेत जमीन दरवर्षी पाण्याखाली जाते. या रस्त्याने झाडेगाव. मानेगाव. पाळोदी. आडसूळ. पाडसूळ. या खेड्याचे विद्यार्थी शेगाव येथे शाळेला जातात या अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. व विद्यार्थ्यांच्या जीवाला सुद्धा पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून नाली वरील पाईप काढून येथे पूल बांधण्यात यावा अशा प्रकारची मागणी होत आहे.



