खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरले आज मुक्ताईनगर मध्ये मराठा समाजातर्फे साखळी उपोषण

मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरले आज मुक्ताईनगर मध्ये मराठा समाजातर्फे साखळी उपोषण

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :-
सविस्तर वृत्त असे की गेले कित्येक वर्षापासून मराठा समाज प्रतिनिधित्वापासून वंचित असल्यामुळे वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदने धरणे आंदोलने रॅली प्रदर्शन लाखोच्या संख्येने मूक मोर्चा काढून मराठा बांधवांनी एक विश्वविक्रम करून कुठेही गालबोट जाळपोळ किंवा हिंसक वळण अद्याप पर्यंत लागू दिलेले नव्हते एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलने मोर्चे करून सुद्धा अद्याप पर्यंत मराठा समाजाला कुठल्याही सरकारने प्रतिनिधित्व मिळवून दिलेले नाही या उलट काही ओबीसी नेत्यांना आणि संघटनांना हाताशी धरून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर ओबीसी सुद्धा मोर्चे आंदोलने करतील आणि रस्त्यावर उतरतील असा इशारा देत होते सरकारचा हा कुटील डाव लक्षात घेऊन मागील 40 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आणि मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या अशा एकदा परत पल्लवीत झाल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर दिलेला कालावधी संपून सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाचा तिढा सरकार सोडवत नसल्याचे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी परत एकदा आमरण उपोषणाचे अस्र उगारले त्याचे लोन पूर्ण महाराष्ट्रभर पसरले त्याच अनुषंगाने
आज सकाळी 10 वाजता प्रवर्तन चौकात महापुरुषांना वंदन करून सर्व मराठा समाज मुक्ताईनगर यांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले जर जरांगे पाटील यांच्या जीविताला काही बरे वाईट झाल्यास शासनाला मराठा समाजाचा उद्रेक परवडणारा नसेल तेव्हा शासनाने मराठा समाजाने हल्लाबोल करण्याची वाट न पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून मराठा समाजास ओबीसी मधून 50% च्या आत आरक्षण देण्यात यावे त्यानिमित्त आज एक दिवशीय साखळी उपोषणाद्वारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन सर्व मुक्ताईनगर तालुका मराठा समाज बांधवाकडून शासनाचा तीव्र शब्दात निषेध ठराव पास करण्यात आला तेव्हा प्रशासनाने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन भविष्यातील उद्रेक व त्याचा परिणामांची जाणीव शासनास अवगत करून द्यावी अशा आशयाचे निवेदन उपोषण स्थळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सर्व मराठा समाज मान्यतेनुसार हभप रविंद्र हरणे महाराज यांचे हस्ते देण्यात आले.
आज या एकदिवसीय साखळी उपोषणाला व आरक्षणाच्या मागणीस मोठ्या प्रमाणावर मुक्ताईनगर तालुक्यातील गावागातांली मराठा समाजासह इतरही समाज बांधव आणि संघटनांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला तसेच आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी बाहेर गावी असल्याने फोन वरून पाठिंबा दर्शविला, मुस्लिम समाज, अखिल भारतीय काँग्रेस कमीटी, शिवसेना राज्य अल्पसंख्यांक आघाडी, शिवसेना तालुका आघाडी मुक्ताईनगर, छावा संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष यांनी पाठिंब्याचे पत्र देवुन सहभाग नोंदविला,
मराठा समाज साखळी उपोषणाची संकल्पना, व्यवस्थापन, आयोजन आदरणीय किशोर गावंडे बापुसाहेब (अध्यक्ष रामरोटी आश्रम) यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली, या आंदोलनात तालुक्याभरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button