खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी: मुक्ताईनगरच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा! ३८५ कोटींचा निधी मंजूर!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

​आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश! गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
​आज मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
​या गावांना मिळणार न्याय:
मुक्ताईनगर शहर (४१३+२२ घरे), भोकरी,पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे,नरवेल,पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी , पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक, आंदलवाडी या गावातील रखडलेल्या नागरी सुविधा व काही नवीन घरांच्या प्रस्तावासाठी या 385 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याप्रसंगी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील,आ. चंद्रकांत पाटील, नंदकुमार महाजन, विनोद तराळ आणि त्या गावातील प्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते.
​दिलेला शब्द पाळला! विकासाचा संकल्प, प्रगतीचा मार्ग!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button