बुलढाणामहाराष्ट्र

नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांच्या नेतृत्वात चिखली विकासाच्या मार्गावर – आ. श्वेता महाले पाटील

स्टार भारत लाईव्ह ऐकसप्रेस

चिखली : प्रतिनिधी

आरुना दतात्रय खंडागळे

चिखली नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, असा ठाम आशावाद चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या स्वागत समारंभात बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, पंडित दादा देशमुख यांचा अनुभव, सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे चिखली नगरपरिषदेत सकारात्मक व लोकाभिमुख कामकाजाला गती मिळेल. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, प्रकाशयोजना आणि नागरी सुविधा यांसारख्या विषयांवर ठोस व वेळेत निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी भाजप सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. नगरपरिषदा, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून सातत्याने भरीव निधी उपलब्ध करून दिला जात आहे. विशेषतः चिखली शहराच्या विकासासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला असून, त्या शब्दामुळे चिखली नगरपरिषदेला विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी आदरपूर्वक व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार शहरांच्या पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे चिखली शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असेही आमदार श्वेता महाले पाटील यांनी नमूद केले.

आमदार श्वेता महाले पाटील यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना पक्षभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. पंडितदादाच्या मार्गदर्शनाखाली चिखली नगरपरिषद पारदर्शक, गतिमान आणि नागरिककेंद्री प्रशासन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनीही आमदार श्वेता महाले पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात चिखली शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्याचबरोबर काही जणांनी अतिशय उत्कृष्टपणे लढत देऊनही त्यांचा विजय थोड्या अंतराने हुकला, अशा शिलेदारांनी हार मानायची नसून,ही काहीतरी अधिक चांगल्या गोष्टीची सुरुवात ठरेल असा आशावाद बाळगायचा आहे!असेही आमदार सौ. महाले पाटील म्हणाल्या.

एकूणच, नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांच्या नेतृत्वात, आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप सरकारच्या ठाम पाठबळावर चिखली शहर विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करेल, असा ठाम आशावाद या कार्यक्रमातून नवीनच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सौ. सुषमा विलास चव्हाण, सौ. प्रिया राम बनसोडे, श्रीमती ज्योती भगवान वाळेकर,सौ. अश्विनी विश्वनाथ जाधव, सौ. विमल रामदास देवडे, तसेच शेख रफिक कादर, दीपक विश्वनाथ खरात,अमोल सुरेश खबुतरे, गुरुदत्त विनायक सुसर, दीपक बुलचंद वाधवानी, सुहास रामकृष्ण शेटे, आणि मोहित धनंजय व्यवहारे या नगरसेवक मंडळींनी व्यक्त केला✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button