बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
विपसना शिबिर करणे काळाची गरज, त्यामुळे भरकटलेल्या व अंधश्रद्धेत आकंठ बुडालेल्या अशुद्ध मानवी मनाला शुद्ध करण्यासाठी सोपा आणि सहज उपलब्ध असलेला उपाय…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.
प्रतिनिधीचा लेख,:-आजचा काळ हा अत्यंत वेगवान असा काळ आहे. तंत्रज्ञान स्पर्धा भौतिक प्रगती आणि अपेक्षांचे ओझे यामुळे माणूस बाहेरून हा सक्षम दिसतो परंतु आतून मात्र अस्थिर चिंताग्रस्त आणि असंतुलित होत चाललेला आहे. अशा अस्थिरकाळात मनशांती विवेक आणि जागरूकता देणारी साधना म्हणजे विपश्यना जी केवळ ध्यान पद्धती नसून जीवन जगण्याची वैज्ञानिक आणि अनुभव आधारित अशी कला आहे. गौतम बुद्ध यांनी मानवी दुःखाचे मूळ शोधण्यासाठी राजवैवाचा तयार केला. कठोर तपश्चर्या चिंतन आणि ध्यान साधनांच्या माध्यमातून त्यांनी दुःख त्यांचे कारण आणि त्यावरील उपाय यांचे ज्ञान प्राप्त केले त्यांनी दिलेला अष्टांगिक मार्ग हा केवळ तत्त्वज्ञाने नाही तर आचरण योग्य जीवन पद्धती आहे या मार्गातील सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा सार म्हणजे विपश्यना साधना. तथागत भगवान गौतम बुद्धांनी अनुभवावर भर दिला. स्वतः अनुभवातून आणि सत्य जाणून घ्या. त्यांचे शिष्य संघ इत्यादी बौद्ध संघ हे ध्यान साधनेत पारंगत होते. संघातील भिकू भिक्खूंनी विपश्यना साधनेच्या बळावर मनातील लोक द्वेष आणि मोह यांचा क्षय केला. त्यांनी समाजाला करुणा समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. त्यामुळे संघ ही केवळ धार्मिक संस्था नव्हती. ती जागरूक अनुशासित आणि सुसंस्कृत समाज व्यवस्थेचे आदर्श उदाहरण होती. वि म्हणजे विशेष आणि पसन्ना म्हणजे पाहणे म्हणजेच वस्तुस्थितीला जशी आहे तशी पाहणे. विपशनेची सुरुवात श्वासाच्या निरीक्षणाने आनापान होते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन स्थिर होते. त्यानंतर शरीरातील सूक्ष्म संवेदनाचे निरीक्षण केले जाते. या प्रक्रियेत साधकाला जाणवते की प्रत्येक संवेदना क्षणभंगुर आहे. ती उत्पन्न होते आणि लगेचच नष्ट होते. ही अनित्य आणि च्या समजली की मनातील असती आणि द्वेष कमी होतात. हळूहळू मन संतुलित शांत आणि प्रज्ञावान बनते. आजची तरुण पिढी सततच्या स्पर्धेत आणि आभासी जगात गुरफडली गेली आहे. सोशल मीडियामुळे तुलना वाढली आहे. यशाची व्याख्या बाह्य साधनांवर अवलंबून झाली आहे. आणि असुरक्षितता वाढताना दिसत आहे. अशावेळी विपश्यना ही मानसिक आरोग्याची प्रभावी साधना ठरत आहे. ती शिकविते तणावाच्या क्षणी संयम राखणे, प्रतिक्रिया न देता सचक प्रतिसाद देणे. विपसना व्यक्तीला आतून मजबूत बनवते. बाह्य परिस्थिती बदलली नाही तरी मनाची स्थिरता जिंकून ठेवण्याची क्षमता वाढवते. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी माझे दुसरे दहा दिवसीय विपश्यना शिबिर जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे मागील काही दिवसात पूर्ण केले. निसर्गरम्य शांत आणि प्रदक्षण मुक्त वातावरणात ही साधना करण्याचा अनुभव अत्यंत गहन आणि परिवर्तन कार्य होता. दहा दिवसांची मौन शिस्तबद्ध दिनक्रम पहाटेपासूनच रात्रीपर्यंत ध्यान साधना. या सर्वांनी मनाला एक वेगळी दिशा दिली. बाह्य जगापासून तात्पुरते दूर राहून अंतर्मनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रारंभी मन अस्थिर असे वाटायचे, मनामध्ये विचारांची प्रचंड गर्दी जाणवली, परंतु दिवसागणिक मन शांत होत गेले. संवेदनांचे निरीक्षण करताना अनित्यता प्रत्यक्ष अनुभवता आली. मनातील, असंतोष आणि तणाव हळूहळू कमी होत गेला. त्या निसर्ग मय वातावरणात ध्यान करताना जाणवली की खरी शांती बाहेर नाही ती आपल्या अंतर्मनातच बदललेली आहे. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की समाज बदलायचा असेल तर प्रथम व्यक्ती बदलली पाहिजे. विपश्यना ही अंतर्मुख क्रांती आहे. ती हिंसा द्वेष आणि असहिष्णता कमी करणे आणि समतेची भावना मानवाच्या मनामध्ये वाढवते. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला संदेश फक्त दीप भव स्वतःचा दीप बना म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा... आज जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात अधिकाधिक प्रासंगिक आहे. विपश्यना हीच ती ज्योत आहे जी अज्ञान तणाव आणि अस्थिरतेचा अंधार दूर करू शकते. आजच्या अस्थिर स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त युगात विपश्य नाही विलासिता नसून अत्यावश्यक अत्यंत अशी काळाची गरज आहे. ती मनाला असतेर्य बुद्धीला प्रज्ञा आणि जीवनाला योग्य दिशा देते. मी हा लेख माझ्या जीवनात आलेला स्वतःचा अनुभव म्हणजेच मी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथेच मागील काही दिवसांमध्ये विपश्यना शिबिर मी स्वतः अनुभवले आहे. आणि तेथील माझा अनुभव याची साक्ष मला देतो.



