खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रशैक्षणिक

जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेजची विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी मुक्ताईनगर शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी पात्र: (तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेचे व आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करत यशाची परंपरा कायम जोपासलेली दिसून येते.शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरील तथा काही महत्वाच्या परीक्षा घेतल्या जातात त्यासाठी संस्था चालक आणि मुख्याध्यापक स्वतः लक्ष घालून शिक्षकानं मार्फत वैयक्तीक मार्गदर्शन करण्यावर भर दिला जातो. NTS,NMMS,MTS, नवोदय, मंथन, I AM WINNER, डॉ होमी भाभा, टिळक महा.विद्यापीठ हिंदी – इंग्रजी परीक्षा,चित्रकला परीक्षा …अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. या वर्षी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एक विद्यार्थिनी पात्र ठरली.त्यात


श्लोक निलेश महाजन – 240
ईशिका भूषण लोखंडे – 190
राजलक्ष्मी निलेश सावळे – 180
समृद्धी कपिल जंगले – 166. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु देवश्री विकास पाटील – 176 गुण मिळवून गुणवत्ता शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.सदर विद्यार्थी शाळेतील गुणवंत विद्यार्थी असून अनेक परीक्षा व स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळविलेले आहे.
नुकताच समर्थ शिवाजी वंजारी हा विद्यार्थी होमी भाभा संस्थे मार्फत इस्रो येथे जाऊन आला.अशा सर्व सहभागी विद्यार्थी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष ऍड.रोहिणीताई खडसे,सचिव डॉ.सी.एस.चौधरी, उपाध्यक्ष श्री नारायण दादा चौधरी,सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री एन पी भोंबे उपमुख्याध्यापक श्रीमती व्ही के शिर्के,पर्यवेक्षक तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button