बुलढाणामहाराष्ट्र

शिल्लक कारणावरून एका महिलेस शिवीगाळ वमारहाण केल्यास ६ जणांविरुध्द गुन्हा

शिल्लक कारणावरून एका महिलेस शिवीगाळ वमारहाण केल्यास ६ जणांविरुध्द गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर शेगाव : क्षुल्लक कारणावरून २१ वर्षीय महिलेला पाच ते सहा जणांनी अश्लील शिवीगाळ करून चापटा बुक्यानी मारहाण केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वा. दरम्यान माऊली वॉटर पार्क येथे घडली.याबाबत अकोला शहरातील डाबकी रोडवर राहणाऱ्या श्रद्धा जगदीश मगर वय २१ वर्षे या महिलेने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, मी माझे पती व साक्षीदारसह माऊली वाटर पार्क मध्ये स्विमिंग करता गेले. दुपारी ४.३० वा. दरम्यानमाझे पतीने त्या ठिकाणी स्विमिंग टँगचे बाजूला खेळणे बंद का आहे असे विचारल्याचे कारणावरून पत्रकार ढोले व अनोळखी चार इसम यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून मला अश्लील शिवीगाळ केली आणि चापटा व लाथाबुक्याने मला मारहाण केली. अशी फिर्याद सदर महिलेने दिली. यावरून ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम २९४, १४३, ३२३ भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका राजेश गाडेकर करत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button