महाराष्ट्रविदर्भ

*तेल्हारा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता.प्रतिनिधी

तेल्हारा/अकोला दि.११ — क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा नगरीमध्ये भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तेल्हारा शहरातील शेगाव रोडवरील पुरुषोत्तम इंगळे यांचे प्रतिष्ठाना पासून महात्मा फुले यांच्या जयघोषात संपूर्ण शहरभर भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध तर शहरातील टॉवर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांकडून पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये रथामधील महात्मा फुले यांची मूर्ती व शिस्तबद्ध अशा आकर्षक वेशभूषेतील पिवळ्या फेट्यातील  महिला मिरवणुकीची शोभा वाढवत होत्या.
     मिरवणुकीची सांगता अनंतराव भागवत मंगल कार्यालय येथे करण्यात आली. या ठिकाणी भव्य अशा  सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, जि. प. अकोलाच्या विद्यमान अध्यक्षा संगीताताई नंदकिशोर अढाऊ, जि. प. सदस्य संजय अढाऊ, पं.स.सदस्य संजय हिवराळे, अरविंद उमाळे, गोकुळाताई महेंद्र भोपळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्ध विधीज्ञ संतोष रहाटे, काँग्रेस कमिटीचे श्यामशील भोपळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश दारोकार, ग्रा.पं.बेलखेडचे उपसरपंच नंदकिशोर निमकर्डे, पाथर्डीचे सरपंच प्रकाश उगले, मनब्दा येथील सरपंच गोपाल राऊत, खंडाळाच्या सरपंच स्वातीताई गजानन वानखडे, उद्यान पंडित गजानन वानखडे, भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, भाजपचे युवा नेता लखन राजनकर, राज्य कार्यकारणी सदस्य श्रीकांत तायडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप बाळकृष्ण खारोडे,केंद्रप्रमुख प्रकाश राऊत, प्राचार्य अरविंद गि-हे, दुर्गाताई विठ्ठलराव इंगळे, नंदकिशोर अढाऊ सर, प्रकाश वानखडे सर,
प्रसिद्ध व्याख्याते भीमराव परघरमोल सर, अ.भा. माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भड, श्याम जिंदे तर तालुकाध्यक्ष हरिदास भोपळे, दानापूर येथील ग्रा. पं. सदस्य रवींद्र तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून वैभव निमकर यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांचे जीवन कार्यावर सविस्तर विवेचन केले. महेश गणगणे, संगीताताई अढाऊ यांनी यावेळी मार्गदर्शनपर असे मनोगत व्यक्त केले. रवींद्र विश्वनाथ गि-हे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ या व पुढील कार्यक्रमांसाठी नवीन डायस देणगी म्हणून दिला. त्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. मिरवणुकीला व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सचिन ठोमरे सरांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत  खाडे यांनी केले. सुरुची सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्या विविध शाखेचे सर्व पदाधिकारी-सदस्य, शहरातील व तालुक्यातील सर्व माळी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button