जिल्ह्यातून घवघवीत यश, पीएम श्री जि. प. हायस्कूल आसलगांवचा शिष्यवृत्ती परीक्षेत ठसा..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका
प्रतिनिधी हरिदास इंदोरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 2025 -26 मध्ये पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथील विद्यार्थिनी जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
या परीक्षेत भाग्यश्री कारोडे हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक, कृष्णाली टापरे हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक, तर आदर्श वानखडे याने मागासवर्गीय प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले. या यशामागे केंद्रप्रमुख महादेव कुवारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सुरेश भोपळे सर, अनिल भगत सर आणि सुचिता जैन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन केले.मा मुख्याध्यापक प्रेम सिंग राठोड सर यांच्या नेतृत्वाखाली शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिष्यवृत्ती परीक्षेची प्रभावी तयारी करून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा परिसरात आनंदाचे वातावरण असून, पालक, ग्रामस्थ, व शिक्षण प्रेमींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, केंद्रप्रमुख, मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



