नैसर्गिकमहाराष्ट्रशेती

जिल्हा बुलढाणा गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पाऊस पाऊस बुलढाणा शहर परतला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

जिल्हा बुलढाणा गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पाऊस पाऊस बुलढाणा शहर परतला आहे. तसेच आतुरतेने वाट पाहत. असलेल्या पिकांना रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे जीवनदान दिले असून. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पिके पावसाविना कोमोजू लागली होती. दीर्घ खंडानंतर बुधवारी रात्रीच्या सुमारास वरून राजाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाले आहेत. यंदा तालुक्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरीपाच्या पेरण्या उशिरा सुरू झाल्या.दरम्यान पिकापुरता पाऊस झाल्याने सोयाबीन सह इतर पिके चांगली बहरली. मात्र,जुलै अखेर पासून पावसाने दडी मारली त्यामुळे फुलोऱ्यातील असलेले सोयाबीनची फुल गळती झाली. शिवाय वाढही कुंडली दरम्यान पावसाने ताण कायम ठेवल्याने हलक्या व मध्यम जमिनीवरील पिके करपून गेली तर चांगल्या जमिनीवरील यंदा आतापर्यंत झालेला पाऊस जमिनीची तहान भागू शकलेला नाही. त्यामुळे पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना सुद्धा जलस्तोत्रांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. विहिरी. तलावात पाण्याची वाढ होण्यासाठी पुढील काही दिवस दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button