महाराष्ट्रमुबई

श्री गणेश विद्या मंदिर दातिवली दिवा पूर्व शाळेत गोकुळाष्टमी उत्सव जल्लोषात संपन्न .

दिवा – (सचिन शेलवले ) दिनांक 6/9/23 रोजी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्या मंदिर शाळेत सकाळी इयत्ता १ ली ते ३ री पर्यंत दहीहंडीचा कार्यक्रम नविन इमारतीत साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहूणे म्हणुन अध्यक्षा श्रीमती लिलावती लक्ष्मण म्हात्रे, सचिव साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे , केतकी म्हात्रे मॅडम, गीता म्हात्रे मॅडम तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल धोंडू भोईर सर तसेच सर्व शिक्षक वृंद तसेच बाल गोपाळ राधे गौळणी च्या रुपात वेष धारण करून आलेले विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत शाळेच्या हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली . प्रथम राधेकृष्णाच्या प्रतिमेला हार घालुन त्याचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . प्रथमता ढोलकी, पेटी, टाळ यांच्या तालासुरात आरत्या झाल्या . त्यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षक यांनी राधा कृष्ण यांच्यावर आधारीत गौळणी म्हटल्या . पेटीवादक सचिन शेलवले तबला वादक इंद्रजित करटुले गायक सचिन पाटील या सर्वांना साथ देणारे प्रेरणा मॅडम, रोशनी मॅडम, नलिनी मॅडम, रेश्मा मॅडम, मीरा मॅडम, माधवी मॅडम व निलम मॅडम या सर्वांनी साथ दिली . त्यानंतर मुलांचे डान्स झाले . त्यानंतर छोट्या गोपाळांची दहीहंडी फोडण्यात आली .
इयत्ता ४ थी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची दहिहंडी जुन्या शाळेत बांधण्यात आली . सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत व सर्व शिक्षक वृंद ( पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग ) यांच्या उपस्थितीत प्रथम गोंविदा प्रतिमेचे पुजन करून आरत्या झाल्या . त्यानंतर छोट्या बालगोपाळांची दहिहंडी फोडण्यात आली .नंतर १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे डान्स झाले . खुप चांगल्या प्रकारे मुळांनी दहिहंडी च्या गाण्यांवर डान्स बसविले होते . त्यांनंतर मुला मुलींनी सुंदर एकापेक्षा एक मनोरे रचून सलामी दिली . त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली . गोकुळाष्टमीचा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला सर्व मुले नाचण्या गाण्यात सामील झाली होती .सर्वत्र जल्लोष आनंदमय वातावरण पसरले होते . मुलांनी बसविलेले डान्स बघण्यासाठी पालकांची सुद्धा गर्दी ओसंडुन वाहिली होती . दिवसभर जिजाऊ बालसंस्कार केंद्र दातिवली, पूर्व प्राथमिक व प्राथमिक , माध्यमिक व उच्चमाध्यमिक व माय मदर इंग्लिश मिडीयमच्या मुलांचे दहिहंडी चा कार्यक्रम जुन्या शाळेत साजरे करण्यात आले . मुलांचे डान्स सादरीकरण, सुंदर मनोरमे त्यानेतर दहिहंडी फोडण्याचे कार्यक्रम जल्लोषात साजरे झाले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button