महाराष्ट्र

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

पातुर तालुका प्रतिनिधी

सुखलाल उपर्वट

बालविवाह अधिनियमानुसार मुलीचे वय १८ वर्ष व मुलांचे वय २१ वर्ष असणे आवश्यक आहे यापेक्षा कमी वय असल्यास तो बालविवाह माणुन कायद्याने गुन्हा ठरतो यासाठी दोन वर्षे सक्षम कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो तरीही महाराष्ट्र सह जिल्ह्यात या कायद्याचे उल्लंघन सर्रासपणे केल्या जाते परंतु अकोला जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला बालविकास, जिल्हा बालसंरक्षण कक्ष अतिशय उत्कृष्ट पणे काम करत असुन २०२२/२०२३ मध्ये आता पर्यंत १५/१६ बालविवाह रोखले आहेत अश्या कर्तव्यदक्ष अधिकारी,व कर्मचाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय येथे जाऊन त्यांचा सत्कार केला यामध्ये श्री पुसदकर सर जिल्हा परिविक्षा अधिकारी. राजू लाडुलकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी.
संरक्षण अधिकारी-
सुनील लाडुलकर , सुनील सरकटे योगेंद्र खंडारे, सतीश राठोड, नितीन अहिर, रेवत खाडे, रेश्मा मुरूमकर. यांचा त्यांचा कार्याचा गौरव व्हावा व आणखी संविधानिक काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पुप्षगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले,ॲड रोशन तायडे, आकाश मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button