बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तरोडा कसबा येथील विवाहित महिला शेगांव तून बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव : येथील मंदिर परिसरामधून एक अठरा वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजे दरम्यान घडली याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये अंगत डीगांबर बेलुरकर वय २९ वर्ष रा. तरोळा कसबा पोस्ट गव्हाण ता शेगाव यांनी फिर्याद दिली. की त्याची पत्नी सौ पलवी अंगत बेलुरकर वय १८ वर्ष रा. तरोळा कसबा ही २० जुलै रोजी दुपारी श्रींचे दर्शन घेण्यास आले होते. तेव्हा पत्नीने तिथे आत्याला माझी आताच मासिक पाळी आल्यामुळे मी देवदर्शन घेऊ शकत नाही तुम्ही दोघे जण दर्शन घेऊन या असे म्हणून ती मंदिरातील बडाचे झाडाखाली थांबते असे म्हणून ती बाहेर थांबली त्यानंतर दर्शन घेऊन १ वा. परत जालो असता श्री गजानन महाराज मंदीर परीसर शेगाव येथून कुठतरी निघून गेली. सदर महिलेचे अंगात हौरव्या रंगाची साडी व हीरव्या रंगाचे ब्लाउज उंची ५ फुट १ इंच बांधा रंग निमगोरा, चेहरा गोल, पायात चप्पल नाही गळ्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व पिवळया धातुची पोत कानात बेनटेक्सचे रिंग डाव्या गालावर मोस असे वर्णन आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिसींग दाखल केले असून अधिक तपास एएसआय गजानन गावडे करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button