खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

जामनेरमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; पुतळ्याचे दहन

जामनेर (प्रतिनिधी)

: भारतीय जनता पक्षच्या जामनेर तालुका पदाधिकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांची तुलना करत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
रविवारी सकाळी जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढत सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचा पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान “तात्काळ राजीनामा द्यावा” अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भांडे, प्राचार्य शरद पाटील, नगरसेवक अध्यक्ष बाबुराव हिवराळे, अमर पाटील, नवल पाटील, रवींद्र झालटे, प्रल्हाद सोनवणे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button