अपघात

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव

दुचाकीची दुरूस्ती करून घरी परतत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ५ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पुर्णाड फाट्याजवळ घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनिल गोवर्धन राठाडे (वय ३५) रा. टाकळी ता. मुक्ताईनगर, असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल राठोड हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी व तीन मुलांसह राहत असून मजूरी व खासगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ५ डिसेंबर रोजी सुनिल राठोड हा त्यांची दुचाकी दुरूस्ती करण्यासाठी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे गेलेला होता. दुचाकीची दुरूस्ती करून तो रात्री ८.३० वाजता घरी परतत असतांना पुर्णांड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button