हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक अभियानाला मोठे यश ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण
बुलढाणा- (दि 1 सप्टेंबर)
मेवाडचे आराध्य दैवत, हिंदवी स्वाभिमानाचे प्रतीक, शौर्य आणि त्यागाची अमर गाथा असलेले वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ भव्य पुतळ्यासाठी अखेर माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या कडून अंतिम परवानगी प्राप्त झाली आहे.ही अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब संपूर्ण राजपूत समाजासाठी तसेच वर्णा गावासाठी गौरवाचा क्षण आहे.
या महान कार्यासाठी महाराणा प्रताप स्मारक अभियान राष्ट्रीय संरक्षक मा. श्री. जी.हुजूर डॉ. लक्ष्यराजसिंह मेवाड व महाराणा प्रताप स्मारक अभियान प्रदेश संरक्षक श्री सरकार साहेब रावल यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराणा प्रताप स्मारक अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रवीरसिंह नमाना, राष्ट्रीय प्रबंधन कमिटी सदस्य श्री देवराजसिंह राजपुत, खामगांव तसेच महाराणा प्रताप स्मारक अभियान प्रदेश अध्यक्ष श्री सचिन राजपूत यांच्या नेतृत्वात तसेच राणा नवयुवक मंडळाचे पधादिकारी व जगदीश रामसिंग इंगळे ,व समस्त ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश संपादन झाले आहे.
समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला हा अश्वरूढ पुतळा पुढील पिढ्यांना शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम ,आणि एकतेची प्रेरणा देणारा ठरेल.
आजचा दिवस हा केवळ परवानगी मिळण्याचा नाही, तर समाजाच्या एकजुटीचा, प्रतिष्ठेचा आणि इतिहास जपण्याच्या संकल्पाचा विजय आहे .
या कार्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
ईश्वर चरणी प्रार्थना की, महाराणा प्रताप यांचे आशीर्वाद सदैव समाजावर राहो आणि असेच एकजुटीने समाजहिताचे कार्य पुढेही घडत राहो.






