सहाय्यक अध्यापक मारुती शिवरकर सर २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छेने सेवानिवृत्त; समाज व विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता

गौरव सेवापूर्तीचा! मारुती एकनाथ शिवरकर सर यांना स्वेच्छा सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:स्थानिक शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व, सहाय्यक अध्यापक श्री. मारुती एकनाथ शिवरकर सर काल दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून स्वेच्छेने सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त शिक्षण क्षेत्र, विद्यार्थी आणि समाजबांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवरकर सर यांनी आपल्या शिक्षकी कारकिर्दीत तब्बल २५ वर्षे, ५ महिने आणि ११ दिवस इतका प्रदीर्घ, समर्पित आणि यशस्वी सेवाप्रवास पूर्ण केला. या संपूर्ण कालखंडात त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. एक शिस्तप्रिय, अभ्यासू आणि तितकेच मायाळू शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.
काल त्यांच्या सेवापूर्तीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या या प्रवासाला आज अधिकृत विराम मिळाला असला, तरी त्यांनी पेरलेले ज्ञान आणि संस्कार पिढ्यानपिढ्या जिवंत राहतील. ‘शिक्षकी सेवेला आज विराम मिळाला असला, तरी विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि ज्ञानवाटपाची भावना सदैव कायम राहील,’ अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
त्यांच्या भावी निरोगी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी समस्त विद्यार्थी वर्ग, शिक्षक सहकारी आणि हितचिंतकांकडून त्यांना मनःपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत!






