बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रोहडा–अंत्री खेडेकर रस्त्यासाठीचे उपोषण मागे; उद्यापासून काम सुरू करण्याचे आश्वासन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली… प्रतिनिधी
आरुणा दत्तात्रय खंडागळे

.
चिखली, दि. १ जून (प्रतिनिधी) – तालुक्यातील रोहडा व अंत्री खेडेकर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी रोडा–अंत्री खेडेकर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या मागणीची तात्काळ दखल घेत सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी उद्यापासूनच रस्त्याच्या कामासाठी यंत्रसामग्री पाठवून काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी चार वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

रोडा–आंतरीखेडेकर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामस्थांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

उपोषणाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे उपसभापती किसनराव धोंडगे, माजी सभापती राम खेडेकर, आरपीआयचे विदर्भाध्यक्ष संजय वाकोडे आदींचा समावेश होता.

उपोषणकर्त्यांमध्ये राहुल टाकळकर, संजय खेडेकर, सागर खरात, समाधान पेंढारकर , अमोल मोरे, मधुकर शेळके , प्रमोद मोरे, दगडू खेडेकर, उत्तम माळेकर यांच्यासह शिवाजीराव खेडेकर, विनायक खेडेकर, अजाबराव खेडेकर, भिकाजी खेडेकर, शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे गजानन वायाळ , शिवसेना नेते संतोष भुतेकर आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी केंद्रीय मंत्री खा.प्रतापराव जाधव यांचे स्विय साहायक नीरज काकडे उपस्थित होते, त्यानंतर आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी रोहडा ते अंत्री खेडेकर या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शशिकांत खेडेकर व सुभाष दराडे यांच्या हस्ते आंदोलकांना थंड पेय देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

जनता दरबार सुरू असतानाच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार विजय सवडे, उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रमेश खेडेकर, बाळू पाटील, मिलिंद खेडेकर, पंजाब खेडेकर, वसंतराव खेडेकर, हरिभाऊ खेडेकर, नारायण चितराळे, राजेंद्र बुरकुल, दिपक कळंगे , मोहम्मद शोएब मोहम्मद आसिफ, राहुल लवाळे, एकनाथ खेडेकर, दिलीप मोरे, अमोल खेडेकर, शोभा खरात, भीमराव तळेकर, इंदूबाई तळेकर, सुशीला खरात, अण्णा माळेकर, संजय खरात, रघुनाथ लवाळे, केशवराव सोरमारे, गणेश बुरकुल, परमेश्वर मोरे, रामदास खेडेकर, दीपक खरात, प्रवीण देशमुख, पूंजाजी लवाळे, शिवाजी तळेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदो व सुव्यवस्था राखण्यासाठी अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रूपेश शक्करगे, पोलीस कर्मचारी भरत पोफळे , रवी गीते तसेच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button