जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीयसामाजिक

धम्मानंद बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील आंबेडकर नगर येथील धम्मानंद बुद्ध विहार येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सालाबादप्रमाणे येणाऱ्या १३५ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली.बैठकीत सर्वानुमते पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अमोल बाबुराव बोदडे यांची निवड करण्यात आली. तर सचिन भागवत बोदडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नंदू अनिल तायडे यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून अभय विजय बोदडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.या समितीच्या माध्यमातून यावर्षी होणारी १३५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच आंबेडकर विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही ठरविण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिक, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button