महाराष्ट्र

चोरट्यांनी देवही सोडला नाही वारी हनुमान येथे जबरी चोरी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील पोलिसांसमोर मोठे आव्हान….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

अ ब ब, चोरट्यांनी देवही सोडला नाही वारी भैरवगड हनुमान येथे जबरी चोरी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील पोलिसांसमोर मोठे आव्हान…

महाराष्ट्र आणि विदर्भातील सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या आणि बुलढाणा आणि अकोला व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी भैरवगड हनुमान मंदिरात मोठी चोरी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या वारी हनुमान मंदिरात दि 14 जानेवारी मंगळवारी रात्री मोठी चोरी झाल्याची घटना घडली यामध्ये हनुमान मंदिरात झालेल्या चोरीत 4 ते 5 कि चांदीचे आभूषण व दानपेटीत असलेल्या 7000ते 75000 हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केली आहे. अशी माहिती मिळाली आहे. ही घटना दि 15 जानेवारी 2025 बुधवार ला उघडकीस आली. चोरट्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत चोरी करून त्याचे उरलेले साहित्य फोडलेली दानपेटी सह वान नदीचे पात्र ओलांडून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव पोलीस स्टेशन च्या हद्दीत आणून टाकले आहे. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांना पोलिसांचा धाकही उरला नाही! या परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हल्ली या घटनेमुळे चर्चेला चांगलेच उधान आले आहे. बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्हा पोलिसांसमोर लक्षवधी भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या हनुमंताच्या मंदिरात चोरी केलेल्या चोरट्यांच्या मुस्क्या आवडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button