
उभ्या असलेल्या जेसीबी ला टिप्पर ची धडक चार जखमी
सय्यद शहजाद रज्जा खान मुदसिर हुसेन यांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले रवीचे प्राण
8/9/23 सविस्तर वृत्त असे की, खाली टिप्पर असलेले औंढा नागनाथ वरून नागपूरला जात असताना शिवनी फाट्याजवळ उभ्या असलेल्या जेसीबी ला मागून टिप्परने धडक दिलेले टिप्पर मधले तीन व जेसीबी चालक जखमी झाले. अपघात दिसताच समाजसेवक सलीमभाई तेली यांनी तात्काळ अपघाताची माहिती श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिल्ली. तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका ही घटना स्थळी दाखल झाली. अपघात एवढा भयानक होता की टिप्पर चालक टिप्पर मध्ये अडकून पडलेला होता. अशातच मंगरूळ कारंजासाठी निघालेले. सय्यद सहजाद रज्जा खान मुदसिर हुसैन यांनी अडकलेल्या चालकाला काढण्यासाठी प्रयत्न केले व आता प्रयत्नानंतर त्यांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यावेळी मंगरूळपीर ते ठाणेदार शेळके साहेब व त्यांची पूर्ण टीम मोलाचा प्रयत्न केला. यांच्या सर्व प्रयत्नामुळे चालकाचे प्राण वाचले व तात्काळ जखमीला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश राठोड सर यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. रवी वाघमारे वय 30 आच्युत कांबळे वय 36 आनंद लवटे वय 37 रा रुई ता तालुका अहमदपूर जिल्हा लातूर जेसीबी चालक सय्यद अझहर वय 30 रा दिल्ली वेश कारंजा
त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे मदतीसाठी ब्रदर वाणी , मेस्को सिक्युरिटी महिंद्र घुडे वैभव घुले व श्रीगुरुमंदिर रुग्णवाहिका आस आपत्कालीनच्या रमेश देशमुख यांनी मदत केली.
नेहमी आपल्या सेवेत
श्री गुरुमंदिर रुग्णवाहीका सेवा व आस अपत्कालीन पथक
( गुरुभूमी )कारंजा लाड रुग्णसेवक रमेश देशमुख



