महाराष्ट्र

सुखकर्ता गणेश मंडळ रिठदची शिवकालीन वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिसोड तालुक्यातील रिठद गावातील सुशिक्षित व नौकरी आणी व्यावसायीक तरुणाईने सुखकर्ता गणेश मंडळाची स्थापना केली. दरवर्षी वेगवेगळ्या देखाव्याचे तथा न बघीतलेले देखावे, वाद्य तथा सहकारी सदस्याची शिस्त बघता कायम लोकांना रुचेल असेच विषय घेऊन समाजात आदर्श निर्माण होईल याबाबत गांभीर्याने विचार करणारे मंडळ म्हणून परिसरात ख्याती आहे. ही मंडळी प्रत्येक वेळी समाजासमोर नेहमीच आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेने समाजासमोर आदर्श उभा करत असते .या मंडळातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सर्वच सदस्य निर्व्यसनी आहेत.कधिही भांडण-तंटा झाला नाही.अशा विचारधारेच्या युवकांनी श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रयतेच्या कल्याणासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत देखावे, दरवर्षी सादर करण्यात येतात. सुखकर्ता मंडळातील सदस्यगण दरवर्षी गड किल्ल्याचा मागील 12 वर्षा पासून अभ्यासपूर्ण दुर्ग दर्शन दौरा करतात आणि शिवरायांच्या पाहण्यासारख्या बाबी असतात त्या आपल्या भविष्यात व कुटुंबातील लोकांना चांगल्या पद्धतीने आचरणात आणता येतील अशासाठी सहलीवर जात असतात व त्याचेच अनुकरण गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत देखाव्याच्या माध्यमातून दाखवत असतात. यावर्षी कोल्हापूर वरून शिवकालीन वाद्य हलगी आणि शिवकालीन गुप्तहेर जशा बातम्या आणि माहिती देतात त्याच पद्धतीने ह्या मिरवणुकीत सुखकर्ता मंडळाच्या वतीने आजच्या काळात दाखवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला.सर्वच तरुण मंडळींनी या विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजावर,गणराया वर आधारित गीते गात अनेक तरुण ,जेष्ठ पूरुष, लहान मुले सहभागी होऊन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत या तरुणांनी डि.जे.,ब‌‌ॅन्ड इतर आद्य वाद्यांचा वापर न करता प्रदुषण होणार नाही याची काळजी घेतली. मनाला भावेल असेच वाद्य या मिरवणुकीत होते. याची काळजी सुखकर्ता गणेश मंडळाने घेतली हे विशेष या विसर्जन मिरवणूक पारंपारिक शिवकालीन वाद्य होते.असाच आदर्श सर्व गणेश मंडळानी द्यावा.असे आवाहन सुखकर्ता गणेश मंडळाने यावेळी केले आहे.या सुखकर्ता गणेश मंडळाला वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या कडून गतवर्षी अध्यक्ष व सन्माननीय सदस्यांचा सन्मान करून शांततेत व आकर्षक मिरवणूक काढल्याबद्दल पुरस्कारही देण्यात आला.यासाठी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मेजर नंदकुले,जितेश मुरडकर,मोहन गवळी,भारत खडसे,श्रीराम आदमाने , वसंतराव सरनाईक इत्यादी मंडळींनी चोख बंदोबस्त ठेवला कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button