Uncategorized

पत्रकारिता कशी असावी: सत्य आणि जनतेच्या हितासाठी निर्भीडपणे लढणारी !

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – पत्रकारिता हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, ज्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील असते समाजातील घटना,समस्यांचे सत्य मांडणे आणि जनतेच्या हितासाठी काम करणे ही पत्रकारितेची मुख्य उद्दिष्टे असतात. मात्र,सध्या निर्भीडपणे सत्य मांडताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आजकाल काही पत्रकार सत्य मांडताना,विशेषतः भ्रष्टाचार किंवा अन्यायाविरुद्ध लढताना,गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या,खोटे आरोप,आणि शारीरिक हल्ल्यांना सामोरे जातात अशा लोकांना सत्याचे दर्शन होणे नको असते,त्यामुळे ते पत्रकारांना खोटे आरोप लावून किंवा न्यायालयीन खटले लावून गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात यामुळे अनेक वेळा सत्याची लढाई थांबविण्याचा प्रयत्न होतो सत्य मांडण्याचे कार्य हे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे,परंतु या सध्याच्या काळात पत्रकारांनी अशा अडचणींचा सामना करताना न डगमगता निर्भीडपणे उभे राहणे गरजेचे आहे पत्रकारांनी सत्य मांडताना कोणताही दबाव,धोका किंवा प्रलोभन याला बळी न पडता जनतेसमोर खरी बाजू मांडणे हेच त्यांचे खरे कर्तव्य आहे सत्य मांडण्याचे कार्य करत असताना समाजातील सामान्य नागरिकांच्या समस्या,त्यांच्या हक्कांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. पत्रकारितेचा खरा उद्देश हा कोणालाही विनाकारण महत्त्व न देता सत्यघटनांचा मागोवा घेऊन समाजातील चुकीच्या गोष्टींचा पर्दाफाश करणे असावा निर्भीड,निःस्वार्थ,आणि प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणे शक्य आहे प्रत्येक पत्रकाराने हे लक्षात ठेवावे की,समाजाच्या हितासाठी लढणारी आणि सत्याची कास धरून काम करणारी पत्रकारिता हीच खरी पत्रकारिता आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button