महाराष्ट्र

बालविकास शाळेची दिक्षा अमर तायडे राष्ट्रीय स्तरावर .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : मालेगाव येथील बालविकास प्राथमिक शाळा बोरगाव रोड मालेगाव येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करता जिल्ह्यातून निवड झाली होती. त्यात दिक्षा अमर तायडे हीची राष्ट्रीय स्तरावर निवड.
महाराष्ट्र कराटे असोसिएशन द्वारा आयोजित पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या 45 व्या कराटे स्पर्धेमध्ये बालविकास मंदिर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले,या कराटे स्पर्धेमध्ये शाळेच्या एकूण चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये आर्यन वाठोरे,दीक्षा तायडे,करुणा खरात,ज्ञानेश्वरी घाटे. यामधील अंडर 14, 30 किलो वजनी गटामध्ये दीक्षा अमर तायडे वर्ग सातवा या विद्यार्थिनीने सुवर्णपदकाची कमाई करून प्रथम क्रमांक मिळविला व राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरली.या यशस्वी विद्यार्थिनीचे शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे , नंदकिशोर भुसारी क्रीडा शिक्षक गणेश इढोळे व कराटे प्रशिक्षक देवानंद वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव व सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद,कर्मचाऱ्यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button