जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयविदर्भसामाजिकसांस्कृतिक

आरक्षणाच्या हक्कावर परिणाम होऊ नये; उपवर्गीकरणाविरोधात शिवसेना उबाठाची कायदेशीर मार्गाने भूमिका

मुक्ताईनगर : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर केले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या हक्कावर परिणाम होऊ नये तसेच सामाजिक न्यायाच्या उद्देशाने आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.शिवसेना उबाठाचे मुक्ताईनगर तालुका प्रमुख ॲड. राहुल अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण केल्यास सामाजिक एकजुटीवर परिणाम होण्याची शक्यता असून आरक्षणाच्या मर्यादित संधींचे आणखी विभाजन होऊ शकते, असा आक्षेप निवेदनात नोंदविण्यात आला आहे.निवेदनात आरक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा दूर करणे हा असून, उपवर्गीकरणासाठी आवश्यक असलेल्या वस्तुनिष्ठ व अद्ययावत आकडेवारीच्या आधारेच कोणताही निर्णय घेतला जावा, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच अशा निर्णयामुळे प्रशासकीय गुंतागुंत, विविध घटकांमध्ये मतभेद आणि संभाव्य न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि अनुशेष भरतीची मागणीउपवर्गीकरणाऐवजी अनुसूचित जातींसाठी उपलब्ध आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, रिक्त पदांवरील अनुशेष भरती पूर्ण करावी आणि शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. सर्व अनुसूचित जातींच्या शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी समान आणि प्रभावी योजना राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत लोकशाही मार्गाने आंदोलनाचा निर्धारआरक्षणासारखा संवेदनशील सामाजिक विषय असल्याने त्यावर चर्चा व आंदोलन करताना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सामाजिक सलोखा कायम राखणे आणि कोणत्याही समाजघटकाविरोधात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपली भूमिका निवेदन, लोकशाही मार्ग आणि कायदेशीर प्रक्रियेतून शासनापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला.शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना संबंधित घटकांचे हित, उपलब्ध आकडेवारी, संविधानिक तरतुदी आणि न्यायालयीन निर्देश यांचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.यावेळी तालुका समन्वयक ॲड. देवेंद्र बोदडे, ॲड. अशोक बोदडे, तालुका संघटक वसीम भाई मंसुरी, अक्षय पालवे, मुकेश कदम, दीपक सावळे यांच्यासह शिवसेना उबाठाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button