Uncategorized

आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मागणीला मोठ यशस्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

स्वातंत्र्यकाळापासून प्रलंबीत असलेल्या बेलुरा व कासार खेड रस्ता लवकरच पुर्ण होणार-आ.ॲड आकाश फुंडकर
भूसंपादनासह बेलुरा व कासारखेड रस्त्यासाठी एकुण 6 कोटी रुपए मंजूर
मुंबई – अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणीत खामगांव मतदार संघातील इतर कामांसोबतच अत्यंत महत्वाचा बेलुरा व कासारखेड येथील नागरीकांसाठी अत्यंत महत्वाच्या रस्त्याचे कामास मंजूरात मिळाली असून लवकरच भूसंपादन होऊन या गावकऱ्यांसाठी पक्का रस्ता करण्यात येईल अशी प्रतिक्रीया खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी दिली.
खामगांव मतदार संघातील बेलुरा व कासारखेड ही दोन्ही गांव स्वातंत्र्यकाळापासून पक्क्या रस्त्यापासून वंचीत आहेत. याआधी आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर देखील झाला होता परंतु भूसंपादना अभावी हे काम रखडले व निधी परत गेला होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करुन देखील केवळ भूसंपादनाअभावी हा रस्ता प्रलंबीत होता. यासाठी बेलुरा या गावातील तरुणांना आमरण उपोषण देखील केले होते. यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी पुढाकार बेलुरा वासींयाना रस्ता मंजूर करण्याचा शब्द़ दिला.
याबाबत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी या कामासाठी आवश्य़क जमीनीच्या भूसंपादनासह प्रस्ताव शासनास पाठवला व अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणीत उपरोक्त़ दोन्ही गावांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. पुरवणी अर्थसंकल्पात केवळ बेलुराच नाही तर कासारखेड या गावासाठी देखील भूसंपादनास सह रस्त्याचे कामास मंजूरात देण्यात आली. आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश मिळून गावासाठी झटणाऱ्यां तरुणांना आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी पुरवणी अर्थसंकल्पातून बेलुरा साठी रु.3 कोटी व कासारखेड साठी रु.3 कोटी असे एकुण 6 कोटी रुपए मंजूर करुन दिले आहेत.
ही बातमी बेलुरा व कासारखेड या गावकऱ्यासाठी आनंददायी ठरणार आहे हे नक्की.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button