आज दिनांक 09/10/2023 रोजी जि.प.शाळा रास येथील आदिवासी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मिठाई व बाटली चे वाटप दसरा सणानिमित्त शिक्षक भारती व विशे परिवारातर्फे नवनिर्वाचित शिक्षक भारती

आज दिनांक 09/10/2023 रोजी जि.प.शाळा रास येथील आदिवासी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मिठाई व बाटली चे वाटप दसरा सणानिमित्त शिक्षक भारती व विशे परिवारातर्फे नवनिर्वाचित शिक्षक भारती शहापूर तालुका अध्यक्ष श्री.नामदेव बांगर सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरेश विशे सर, गृप ग्राम पंचायत हिव सदस्य श्री.मारुती बांगारी, शाळेचे सहशिक्षक श्री.कृष्णा मडके सर इ.मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षक भारती तालुका अध्यक्ष यांने आपल्या भाषणात सांगितले की.आपले शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश विशे सरांनी शहापूर तालुक्यातील सापगाव केंद्रातील काही शाळा दोऱ्याचापाडा,हिव,अंदाड,सपाटपाडा,रास,वाऱ्याचापाडा,साखरपाडा,मुहुपाडा,आवरे,पुणधे, कांबारे, जांभूळ पाडा, असे अनेक तालुक्यातील जि.प.शाळा सन 2003 पासून विविध संस्था प्रथमच शहापूर तालुक्यात सत्य साईबाबा ट्रस्ट मुंबई, स्वामी समर्थ सेवा मंडळ भाडूंप, अर्चना ट्रस्ट, महेंद्र लॅजिस्टि कंपनी,इ.आपल्या स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाला शाळा दत्तक योजना इ.संस्थे मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेतील भौतिक सुविधा, खाऊचे वाटप, दिवाळी सणाच्या दिवशी कातकरी बांधवांना दिवाळी फराळ, कपडे स्वामी समर्थ सेवा मंडळ भाडूंप यांच्या मार्फत दर वर्षी वाटप करण्यात येते.तसेच विविध संस्था मार्फत दर रविवारी मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार,नेत्र शिबिर,इ.मौलाचे कार्य जिल्हा अध्यक्ष याने केले असे सांगितले.शिक्षक भारती संघटना वाढीसाठी मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाही असे सांगितले.तसेच जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते शहापूर तालुका शिक्षक भारती तालुका अध्यक्ष श्री.नामदेव बांगर सर यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आले.तसेच जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले की जि.प.शाळा भौतिक सुविधा साठी विविध कंपन्यांना दत्तक देऊ नये कारण आमच्या प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले आहे.कोणत्याही कंपनीची गरज नाही.आम्ही शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात समर्थ आहेत असे त्यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री.कृष्णा मडके सरांनी केले.



