Uncategorized

अकोला ते चोहोट्टा बाजार पारळा तेल्हारा मार्ग बस सुरू करा… पुर्णाजी खोडके

मार्गावरील बस ४ महिन्यांपासून बंद…

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे

अकोट: अकोला ते चोहोट्टा मार्गे पारळा-तेल्हारा बस फेरी सुरु करा गेल्या चार महिन्यापासुन रस्त्याच्या कामामुळे बस सेवा हे बंद आहे. त्यामुळे शाळेतील नागरीकांना, अपंग व निराधार लोकांना तसेच शेतकरी वर्गाला सदर रस्त्याने वाहन भेटत नसल्यामुळे पायी प्रवास करावा लागत आहे. पारळा वरुन विद्यार्थी चोहोट्टा बाजार येथे शाळांमध्ये पाही यावे लागत आहे.व उन्हाळयाच्या दिवसामध्ये प्रवासी वर्गाचे हाल होत. आहेत. आणि असे सांगण्यात येत आहे की, गेल्या दोन महिन्यापासुन भांबेरी येथील मुख्य रोडचे सिमेंट काम सुरु असुन त्यामुळे बस सेवा सदर मार्गाने सुरु होवु शकत नाही. असे ऐकण्यास येत आहे.आणि गेल्या दोन महिन्यापासुन काही कारणास्तव सदरील भांबेरी येथे रस्त्याचे काम रखडलेले आहे. परंतु ते सदरील काम एक खूप दिवस झाल्यानंतर हे चालू होत तरी आणखी पर्याय मार्ग काढून तरी पर्यायी मार्गाने अकोला ते चोहोट्टा मार्गे पारळा-तेल्हारा बस फेरी सुरु करण्यात येवुन ग्रामीण भागातील शाळेतील विदर्यार्थी वर्गाला तसेच अपंग व निराधार लोकांना तसेच शेतकरी अडचणीत सामाना करावा लागत आहे..
तरी बस सेवा सदर पर्यायी मार्ग काढुन सुरु करण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी सांगितले विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ अकोला यांचे कडे व तेल्हारा आगर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंड यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे…….

पारोळा ते चोहोट्टा विद्यार्थी येतात पाई

सदर मार्गावरील विद्यार्थी हे पायी पारळा वरुन निजामपूर देवडा टाकळी खुर्द चोहोट्टा बाजार येथील सार्वजनिक विद्यालयामध्ये येत असतात…

चौकट..

सदरील मार्गावरील रोडचे काम चालू होते परंतु सदरील काम हे पूर्ण झाले. व भांबेरी येथील मुख्य रोडचे काम हे गेल्या चार महिन्यापासून रखडलेले असून ते काम काही अडथळे येत असल्यामुळे. बंद आहे असे बोलले जात आहे. परंतु सदरील पर्याय मार्ग काढून एसटी बस सेवा हे सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे….

उन्हाचा पारा वाढला आहे…

जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे 43 अंश अशातच विद्यार्थी अपंग बांधव निराधार शेतकरी वर्ग हे या मार्गाने पायी येतात..

चौकट…

याच मार्गावरील काही विद्यार्थी त्यांची टायपिंग ची परीक्षा असल्यामुळे एसटी बस सेवा ही बंद असल्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नाहीत .अशी माहिती आहे…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button