Uncategorized

अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का

ज्येष्ठ नेते डॉ.पुरुषोत्तम दातकर वंचितच्या व्यासपीठावर !

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे

अकोट: काँग्रेसचे अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व खारपान पट्टा आंदोलनाचे प्रमुख प्रवर्तक डॉ.पुरुषोत्तम दातकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर येऊन मनोगत व्यक्त केल्याने काँग्रेसच्या गोठात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपा आणि काँग्रेस या पक्षाचे उमेदवार संघाच्या विचारधारेशी जुळलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी बहुजनांचा आधारस्तंभ एड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन डॉ. दातकर यांनी केले.
ते म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. मात्र मला माझं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजपामधून आलेल्या लोकांच्या हातात काँग्रेस पक्ष गेला. त्यामुळे ते वरून काँग्रेसचे जरी दिसत असले तरी ते आतून भारतीय जनता पार्टीचा छुप्या पद्धतीने प्रचार करत आहेत. म्हणून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. दातकर पुढे म्हणाले की, एड. प्रकाश आंबेडकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सोबत आधीच हात मिळवणी केल्यामुळे पटोले यांनीच ही युती होऊ दिली नाही. ते प्रसार माध्यमातून खोटी माहिती देत होते.
मी काँग्रेस पक्षात ज्येष्ठ असल्यामुळे पक्षात चालणाऱ्या सर्व बारीक घडामोडीवर माझे लक्ष होते. वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मी संपर्कात होतो. मात्र नाना पटोले यांनी काँग्रेस सोबत एक प्रकारे गद्दारी केली.
महाविकास आघाडी सोबत आज वंचित बहुजन आघाडी असती तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा पूर्णच बँडबाजा वाजला असता असे ते म्हणाले.
माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे की, या लोकसभा निवडणुकीमध्ये एड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कारण अनुप धोत्रे यांची काही लायकी नसताना त्यांना वारसा चालवण्यासाठी उमेदवारी दिल्या गेली. आणि दुसरे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील काशिनाथ पाटील हे विश्व हिंदू परिषदेचे कट्टर समर्थक होते. प्रांताध्यक्ष होते. आणि ते स्वतः सुद्धा संघाच्या पठडीत, संघाच्या विचारधारेत तयार झाले आहेत असे त्यांनीच अनेकदा फेसबुक पोस्टद्वारे कबूल केले आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी या गोष्टीचा विचार करून मतदान करावे,
डॉ.अभय पाटील भविष्यात तुम्हाला भाजपामध्ये गेलेले दिसतील हे माझे शब्द लक्षात ठेवा. असेही ते म्हणाले. गेल्या ३० वर्षापासून संजय धोत्रे सत्तेत आहेत. तीस वर्षाच्या तुलनेत त्यांनी अकोल्याचा काय विकास केला हे तुम्ही सांगावे ? अकोल्याच्या प्रश्नावर कधी संसदेत बोलताना ते दिसले नाहीत. त्यांच्या नवख्या मुलाला भाजपने उमेदवारी देऊन घराणेशाहीला पाठबळ दिले,हाच घराणेशाहीचा सर्वात मोठा पुरावा आहे.
अकोल्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही. संसदेमध्ये शेतकऱ्याचे, महिलांचे, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार,यांचे प्रश्न रोखठोकपणे मांडण्याची क्षमता फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्येच आहे. या देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत.
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकर संसदेमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. ते संसदेत गेल्यावर मोदींच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांची संख्या निर्णायक आहे. तुम्ही काँग्रेसला मतदान केले तर ते मतदान संघाला आरएसएस ला झाले म्हणजेच भाजपाला झाले, असे समजावे. त्यामुळे भावनिक होऊन मतदान न करता योग्य उमेदवार डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे असे आवाहन डॉ.पुरुषोत्तम दातकर यांनी केले.
डॉ. दातकर ३५ वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि ते अकोला जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. डॉ. दातकर यांच्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. मी काँग्रेसमध्ये असलो तरी एड. आंबेडकर हेच योग्य उमेदवार आहेत असे मला वाटते. मी माझ्या समाज बांधवांना व कार्यकर्त्यांना आवाहन करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती करतो… अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव यांनी आमच्या प्रतिनिधी यांना दिली आहे…
मी काँग्रेसमध्येच – डॉ.दातकर
मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहील. मी माझे मत व्यक्त केले. आणि यापुढे सुद्धा मी करत राहील. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला आहे, याचा राहुल गांधींनी विचार करावा.
डॉ. पुरुषोत्तम दातकर
ज्येष्ठ काँग्रेस नेते व खारपानपट्टा आंदोलनाचे प्रमुख.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button