अपघातखानदेशजळगावा जिल्हा

बांभोरी जवळ भीषण अपघात ; वाळूच्या ट्रकची क्रूझरला धडक, तीन जण ठार

जळगाव (प्रतिनिधी) प्रमोद सोडले

:  जळगाव येथून जवळच असलेल्या बांभोरी बसस्टॉप जवळ वाळूच्या भरधावं ट्रकने मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ बकावा येथे प्राणप्रतिष्ठाकरिता शिवलिंग घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर कारला वाळूच्या धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दि. १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली.

मृतात जळगावच्या तिघांचा समावेश विजय हिम्मत चौधरी (वय् ४०, साई नगर), तुषार वासुदेव जाधव (वय् २८, रा. खोटे नगर) व भूषण सुभाष खंबायत (३५, रा. साई नगर) यांचा मृत झालेल्यांत समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी दि. १५ मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला.या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button