बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

शेगाव: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात आज दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या काकड आरतीपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ सुरू झाली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा तसेच इतर भागातूनही हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी शेगाव येथे दाखल झाले होते.
मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भाविक कुटुंबासह श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक दिसून आले. श्रद्धा व भक्तीभावाने भाविकांनी श्रींच्या चरणी माथा टेकून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.
मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात आले होते. दर्शन रांगा सुरळीत राहाव्यात यासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली होती. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख चौकांवर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
दरम्यान, भाविकांच्या आगमनामुळे शेगाव शहरातही मोठी वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील बाजारपेठ, हॉटेल, भोजनालये तसेच विविध दुकाने याठिकाणीही भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. दिवसभर मंदिर परिसरात “गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button