देऊळगाव येथे पशुसंवर्धन निवारण गोचीड गो माशा निर्मूलन पशुचिकित्सा शिबीर संपन्न

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट
देऊळगाव येथे विदर्भ मराठवाडा दूध विकास प्रकल्पांतर्गत तालुका पशुवैद्यकीय.लघुचिकिसा लय पातुर मार्फत जनावराचे वंध्यत्व निवारण व गोचीड गोमाशा निर्मूलन शिबीर घेण्यात आले आहे या वेळी शिबिरामध्ये ५० गाय म्हशी या वंध्यत्व निवारण करिता औषध उपचार करण्यात येवून २१५ जनावरांचे गोचीड गोमाशा निर्मूलन करण्यात आले या वेळी या शिबिरा करिता डॉ. जगदीश बुकतरे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अकोला यांचे मार्गदर्शन लाभले शिबिराचे आयोजन डॉ. गवळी सर सहआयुक्त पशुसंवर्धन पातुर यांच्या मार्गदर्शनात डॉ. श्रृती चव्हाण पशुधन विकास अधिकारी पातुर डॉ. संदीप गवई, श्री. कांबळे, व योगेश जाधव यांनी केले या प्रसंगी देऊळगाव येथील सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.



