महाराष्ट्रविदर्भ

ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भध्यक्ष नरेंद्र नवनीत इंगळे यांना अमरावती येथे युवारत्न पुरस्कार

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट दैनिक मतदार राज संजय आठवले यांच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई जयंती निमित्ताने आ

योजीत “युवा असावा महत्वकांशी सकारात्मकतेने ओतप्रोत मिळता योग्य दिशा उजळेल प्रगतीची ज्योत” समाजिक क्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरी करत असणारे ग्रामीण युवा संघटनेचे तथा संकल्प बहुउद्देशिय संस्था पारस चे संस्थापक अध्यक्ष मा.नरेंद्र नवनीत इंगळे यांच्या सामाजिक कामगिरीची दखल घेऊन आज त्यांच्या कामाची पावती म्हणुन अमरावती येथे महाराष्ट्र बेस्ट न्यूज तथा दैनिक मतदार राज यांच्या वतीने “युवारत्न पुरस्कार २०२३” देण्यात आला आहे नरेंद्र नवनीत इंगळे हे एक छोट्याशा गावामध्ये राहून समजात असलेल्या अनेक अडचणीवर मात करत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात रात्र दिवस लोकांची मदत करीत असतात.संकल्प बहुउद्देशिय संस्था पारस ही त्यांची संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून २०० पेक्ष्या जास्त युवक युवतीचे लग्न सुधा जुळवून आणले आहे व पुणा,अमरावती,अकोला येथे बुद्धीष्ट मॅरेज ब्युरो चालवतात व याच्या माध्यमातून युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन सुद्धा करत राहतात अश्या अनेक प्रकारे नरेंद्र नवनीत इंगळे हे पूर्ण विधर्भामध्ये ग्रामीण युवा संघटनेमध्ये काम करीत असून त्यांना काही महिन्यांपूर्वीच नागपूर येथे “बहुजन समाज मित्र पुरस्कार २०२२” देण्यात आला व आज अमरावती येथे “युवारत्न पुरस्कार २०२३” देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button