खडसे महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रमातून व स्वच्छतेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिला देशभक्तीचा संदेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्वच्छतेतून स्वच्छ परिसर करून विद्यार्थ्यांनी देश प्रेमाविषयी कला प्रकारातून राष्ट्रीय भावना व्यक्त केली . स्वातंत्र्य दिवस महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाप्रकारातून गीत सादर करून व देशभक्ती पर गीतातून नृत्य सादर केले व स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रप्रेम व राष्ट्रीयता या उदात्त भावनेने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी राष्ट्रध्वज फडकवून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय मनोगत मधून युवा वर्गाने आपले जीवन शिक्षणाबरोबर देश प्रेम व राष्ट्रीय एकात्मता याविषयी खर्च करून देशासाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले. या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राण्याची अवती देऊन आपणा सर्वांना स्वातंत्र्य देण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले त्या महापुरुषांची राष्ट्रसेवा आपल्यामध्येही अंगीकृत व्हावी असे सर्वांना आवाहन केले.श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजीव साळवे व डॉ. वंदना चौधरी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिला. व उपस्थित विद्यार्थ्यांना देश कार्यामध्ये आपल्या युवा वर्गाचा अनमोल वाटा आहे याविषयी अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. डी. एन. बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. रंजना झिंजोरे यांनी केले.या अभियानाप्रसंगी महाविद्यालयातील , प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून स्वातंत्र्य दिवस महाविद्यालयात मनवला.



