बुलढाणामहाराष्ट्र

अटाळीच्या माजी सरपंचाचे उपोषण म्हणजे ग्रामपंचायत निवडणुक डोळयासमोर ठेऊन केलेली नौटंकी – रुपेश खेकडे, तालुकाध्यक्ष युवा मोर्चा

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

अटाळी ता.खामगांव येथे ग्रामपंचायत हददीतील मंदीरास जाणाऱ्या मुख्य़ रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण केले होते. सदरचे अतिक्रमण मागील 8 ते 9 महिन्यापासून थाटलेले आहे. माजी सरपंच महोदय आज अटाळी येथील अतिक्रमण काढण्याबाबत उपोषण करीत आहात. तुमचे उपोषण म्हणजे केवळ नौटंकी आहे.
श्री क्षेत्र अटाळी ता.खामगांव जि.बुलढाणा येथील माजी सरपंच डॉ दिलीप काटोले हे दि.26 जून 2023 पासून उपोषणास बसले आहेत. श्री क्षेत्र अटाळी हे पंचक्रोशीतील प्रसिध्द़ देवस्थान आहे. या मंदीराच्या मुख्य़ रस्त्यावर मागील 8 ते 9 महिन्यापासून काही लोकांनी अतिक्रमण थाटले होते. अटाळी येथील प्रसिध्द़ श्री संत भोजने महाराज पुण्य़तिथी सोहळया पुर्वी सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत सर्व गावकऱ्यांनी तत्कालीन सरपंच यांच्याकडे मागणी केली होती. परंतु सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत याच तेव्हा याच सरपंचांनी सदर अतिक्रमण हे आमच्या हददीत येत नाही अशा प्रकारचे उडवा उडवीची उत्तरे दिली व हे अतिक्रमण काढले नाही.
आज या मुख्य़ रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण नसतांना हेच माजी सरपंच केवळ सवंग प्रसिध्दीसाठी उपोषण करीत आहेत. माजी सरपंच दिलीप काटोले यांच्या कार्यकाळात अटाळी या गावाला 2-2 महिने पाणी पुरवठा करण्यात आला नाही. संपुर्ण गावात घाणीचे साम्राज्य़ पसरले आहे. अटाळी हे एक तिर्थक्षेत्र असून या ठिकाणी शेकडो भावीक दररोज दर्शनासाठी येतात. परंतु या गावात साफ सफाई नाही, या गावात साधे स्त्री- पुरुष मुत्रीघर नाही. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात उपरोक्त़ सरपंचाने गावात कोणतेही विकास कामे केली नाही. त्यामुळे आपले नाकर्तेपण लपविण्यासाठी येत्या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला डोळयासमोर ठेऊन करण्यात येत आहे.
हे उपोषण म्हणजे केवळ नौटंकी असून गावकरी व प्रशासनाची दिशाभूल करणारे आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button