Uncategorized
शेगांव येथे म्हाडा कॉलनी युवती बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
स्थानिक म्हाडा कॉलनी येथील रहिवासी कु. श्रुती संतोष झोंबाडे (१८) ही युवती ५ जुलै रोजी अकोला येथील नातेवाईकांकडे जाते असे तिच्या आईला सांगून घरातून निघुन गेली असता ती घरी परतली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने युवतीची आई सौ. उषा संतोष झोंबाडे (४२) यांनी शहर पो.स्टे. ला मुलगी हरविल्याची तक्रार दिली.
युवतीची उंची ५ फुट २ इंच, बांधा सडपातळ, केस काळे, अंगात लाल रंगाचा टॉप, काळ्या रंगाची सलवार, उजव्या हातावर श्रृती गोंदलेले आहे. घटनेचा तपास पोना संजय करूटले हे करित आहेत.



