जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

बोदवड तालुक्यातील जुनोना रस्त्याचे वृक्षारोपण केलेल्या झाडांची दुर्दशा

सामाजिक वनीकरण चे अधिकारी जोमात वृक्ष कोमात

बोदवड ता.बोदवड:- तालुक्यातील उजनी दर्गा ते जुनोना रस्त्याने सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अंतर्गत अंदाजित काही वर्षाआधी रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली होती या वृक्षांचे सध्याचे स्थिती कठिण झालेली दिसून येत आहे, या वृक्षांना पाण्याची कमतरता, तसेच वृक्षांची काळजी न घेतल्याने बिकट परिस्थिती झालेली दिसून येत आहे तरी या विभागाचे कर्मचारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मजूर उपस्थित नसताना सुद्धा फक्त पैसे काढण्याचा पराक्रम या विभागामार्फत करताना दिसून येत आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या अंदाजपत्रका नुसार या वृक्षांची कोणत्याही प्रकारची काळजी घेताना संबंधित शासकीय कर्मचारी दिसून येत असल्याने शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाईची करण्यात यावी. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित नसताना सुद्धा यांना पगार दिला कसा जातो यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे,बऱ्याच दिवसापासून ही अधिकारी कार्यालयामध्येच नसतात तरी सुद्धा याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
याच तालुक्यात काही दिवसाआधी शेलवड येथील गट वृक्ष लागवड गैरप्रकार करून लाखोंरूपयांचा निधी हडप करून पैसे काढण्याचा विक्रमी पराक्रम केल्या होता, त्याचप्रमाणे उजनी दर्गा ते जुनोना दुतर्फा वृक्ष लागवडीवर करताना अधिकारी कर्मचारी दिसून येत आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button