बुलढाणामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी. प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा कुणबी समाजाकडून गौरव.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२४/८/२०२६.
अकोला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आलेले प्रदेश अध्यक्ष राजेंद्र भाऊ पातोडे यांचा कुणबी समाज बांधव. अकोला जिल्हा यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह. अकोला येथे आयोजित भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते वामनरावजी मानकर हे होते. यावेळी कुणबी समाजाच्या सामाजिक. शैक्षणिक तसेच कुणबी समाजाच्या हक्काचे आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न सोडवले जावेत. अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी राजेंद्र भाऊ पातोडे यांच्याकडे व्यक्त केली.
समाजातील युवकांना शिक्षण व रोजगाराच्या अधिक संधी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा. स्कॉलरशिप यासह समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
त्याचप्रमाणे समाजातील समस्या. काही अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचे आश्वासन राजेंद्र भाऊ पातोडे. यांनी या माध्यमातून समाजाला दिले.
या कार्यक्रमास उपस्थिती. शांताराम पारखेडे. राजेश आडे.(अध्यक्ष कुणबी समाज मंडळ). रामाभाऊ फाटकर(नगरसेवक). शोभाताई मनोहर शेळके. सुनील फाटकर. प्रदीप वानखडे. संतोष यादगिरे. कांतीराम गहिले. अंबादास उगले. राम गव्हाणकर. राजेश गावंडे. डॉ. गायगोले. अरविंद महाले. डॉ. उन्हाळे. गजानन भाऊ दांदडे. यांच्यासह बाळासाहेब ढगे. गजानन बहाकर. सोपान परानाटे. सतीश काळने. बच्चु भाऊ अटकर. विकास कीर्तने. विजय आखरे. अरविंद तीवाने. गोमाजी वरणकर. दीपक बायस्कर. ज्ञानेश्वर कुटाळे. ज्ञानु बहाकर. अमोल तिखट. रामकृष्ण नागोळकर. गौरव यादगिरे. सुधाकर भाकरे. मनोहर ठाकरे. राजेश ठाकरे. दिनेश मानकर. स्वप्निल आकरे. कृष्णदेव कुंबी. भोरे सर. किरण टापरे. सचिन रोहनकर. योगेश शेळके. गजानन उगले. सागर उन्हाळे. राजेश गावंडे. राहुल काटे. मकरंद पातोडे. प्रकाश राऊत. प्रल्हाद काळे. प्रशांत मानकर. सागर गहिले. कपिल पोटे. मनोहर डोके. गोपाळ ढोरे. पांडुरंग दहीभात. अजय वाघ. विठ्ठल खोले. ज्ञानेश्वर निळे. यासह अनेक कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मनोहर शेळके यांनी केले. सूत्रसंचालन शोभाताई शेळके यांनी केली. आभार प्रदर्शन नवे काकड यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button