बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

कविता मुळे यांची भाजपा महिला मोर्चाचिखली शहर सरचिटणीस पदी नियुक्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली : भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी असलेल्या भाजपा महिला मोर्चाच्या चिखली शहर सरचिटणीस पदी सौ. कविता रेणुकादास मुळे यांची नियुक्ती करण्यात आली. आ. सौ श्वेताताई महाले यांच्या निर्देशानुसार भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ लताताई गावंडे व जिल्हाध्यक्षा सौ. सविताताई पाटील यांच्या हस्ते, नवनियुक्त शहराध्यक्षा सौ. ममता बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या बैठकीत कविता मुळे यांना दि. २१ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई शिनगारे, महिला मोर्चाच्या चिखली तालुकाध्यक्ष नीता सोळंकी, जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष नीता जैन, जिल्हा सचिव श्वेता जोशी, जिल्हा कार्यकारणी सदस्य छायाताई खरात यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
कविता मुळे ह्या मागील १० वर्षां पासून भाजपा महिला मोर्चात सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी महिला मोर्चाच्या शहर सचिव तसेच शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. त्यांच्या संघटनात्मक कामगिरीची दखल घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी कविता मुळे यांच्याकडे भाजपा महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. शहरात महिलांचे मजबूत संघटन निर्माण करून आ. श्वेताताई महाले यांच्या विकासकार्यात अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची प्रतिक्रिया कविता मुळे यांनी दिली असून आपल्या नियुक्तीबद्दल आ. श्वेताताई महाले, जिल्हाध्यक्षा सविताताई पाटील व शहराध्यक्ष ममता बाहेती यांचे आभार मानले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button