जळगावा जिल्हासामाजिक

आगळावेगळया फळाचा केकने व्यक्‍त झाले कार्यकर्त्यांचे प्रेम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

ींजळगाव दि — २३ फेबु्र रोजी माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त जळगावचे भाजपा कार्यकर्ते प्रा. विजय चौधरी,अनिल महाजन यांनी फळाचा केक बनवून आणत साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रेमाने माजी खा. डॉ. उल्हास पाटील भारावून गेले.
जळगावातील बायोमेडीकल इंजिनिअर असलेले प्रा. विजय चौधरी आणि अनिल महाजन यांनी आपल्या लाडक्या नेत्याला आगळयावेगळया शुभेच्छा देण्यासाठी कलींगड, ड्रॅगन फ्रुट, पपई,किवी, डाळींब, सत्री आणि मोसबीसह अनेक फळांचा उपयोग करून एक आगळा वेगळा केक तयार करून आणला यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या उपस्थीतीत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते या केकचे कटींग करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या प्रेमाने डॉ. उल्हास पाटील भारावून गेले.अभियंता हा देशाचा पाया आहे आणि त्यांच्या डोक्यातून नवनवीन संकल्पना संशोधनातून बाहेर येवू शकतात ही संशोधक वृत्‍ती कायमस्वरूपी अशीच ठेवून देशाची सेवा करण्याचे आवाहन यावेळी डॉ. पाटील यांनी केले आणि प्रा विजय चौधरी, अनिल महाजन यांना आर्शिवाद दिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button