भाई विजय गवई यांचे दुःखद निधन,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – सागर झगरे
चिखली – (दि.१८ ऑगस्ट) आंबेडकरी चळवळीतील लढवय्या सहकारी विजय गवई यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून विजय गवई यांनी जबाबदारी सांभाळली. अन्याय, शोषण आणि वंचितांच्या प्रश्नांविरोधात सातत्याने आवाज उठवत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीला समर्पित केले.
प्रा. जोगेंद्र कवाडे सरांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. चळवळीतील आमचे अत्यंत जवळचे सहकारी आणि मित्र असलेल्या विजय गवई यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचा संघर्ष आणि सामाजिक न्यायासाठीची बांधिलकी सदैव प्रेरणादायी राहील. विजय गवई यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐



