कृष्णा कराळे च्या मारेकर्यांनालवकरात लवकर कठोर कारवाही करुन फाशीची शिक्षा व्हावी.

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
आज दि. 29 जुलै रोजी खामगाव तहसीलदार साहेब यांना शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या 14 वर्षीय मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना ही समाजामध्ये मन सुन्न करणारी असून मराठा पाटील युवक समिती या घटनेची अत्यंत तीव्र शब्दात निषेध करते. समाजामध्ये अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी निष्पाप बालक कृष्णा हत्ये प्रकरणी जलद न्यायालय कडून चौकशी होऊन हत्ये मध्ये सामील नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी अश्या घटने मुळे समाजा मधे खूप रोष आहे आज तहसीलदार साहेब खामगाव यांना मराठा पाटील युवक समिती वतीने निवेदन देण्यात येत आले यावेळी संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, सकल मराठा चे किशोर भोसले,जिल्हा कार्याध्यक्ष मोहन घुईकर,अविनाश कुटे, तालुकाध्यक्ष राम पारस्कर, कैलास फाटे, प्रफुल पाटील,अमोल टिकार,पवन लांडे, गोपाळ हेलगे, श्रीहरी टिकार, गोपाळ टिकार, गौरव हेलगे, विठ्ठल वडोतकर,पंकज घोगे, अंकित घोगे, अनंता पाटील,श्रेयस कावणे, शुभम खुमकर, ऋषिकेश कांबळे, भरत अंभोरे, यश अंभोरे, शत्रुघ्न अंभोरे, रवींद्र बाणाईत,रामेश्वर हिंगणे,गजानन भुसारी,राहुल मुंढे पाटील, दीपक वरणकार, रोशन लाहूडकर, सतीश ताठे,पवन लाहूडकर,विठ्ठल भुसारी, मनोज बाणाईत, संतोष सातपुते, शे अयान शे अमीर, अमोल वि पाटील, सत्यू शर्मा,राहुल पाटील, अजय गावंडे,अजय भारंबे,अमीर शाह,सह पदाधिकारी उपस्थित होते.



