Uncategorized

रोटी ते भोटा व भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मनविसेच्या वतीने करण्यात आले लाॅलीपाॅप आंदोलन!रस्ता न झाल्यास भोटा,रोटी व हिंगणा भोटा येथील गावकरी करनार निवडणुकीवर बहिष्कार!(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

नांदुरा: तालुक्यातील भोटा ते रोटी व भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा केला पण जि.प.ने याची दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लाॅलीपाॅप आंदोलन करण्यात आले आहे.
सदर रस्ता डांबरीकरण करण्यात यावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला. या रस्त्या साठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर येथे उपोषण करून सुद्धा या रस्त्याची दखल न घेतल्याने आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार व महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे माजी राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ सपकाळ , मनसे जिल्हा अध्यक्ष श्री अमित बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रोटी ते भोटा व भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर व मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या नेतृत्वाखाली लाॅलीपाॅप आंदोलन करण्यात आले.
स्वातंत्र्य प्राप्तीपासुन सदर रस्ता डांबरीकरण न झाल्याने गावकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. तसेच सतत सत्ताधारी व विरोधक निवडणुकीवेळी येथील जनतेला चाॅकलेट देत आले आहेत त्यामुळे मनसेने लाॅलीपाॅप वाटून अनोखे आंदोलन केले आहे.
आंदोलन करतेवेळी भोटा येथील सरपंच कडूभाऊ भोटकर, दादगांव ग्रामपंचायत सरपंच गणेशभाऊ काटे, रोटी सरपंच पती तथा पोलिस पाटील श्री संजयभाऊ उगले, हिंगणा (भोटा) माजी सरपंच श्री सुनील खवले, भाजपाचे भोटा बुथ प्रमुख अजाबराव पारस्कर, भाजपाचे विकास घुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल डिगांबर पारस्कर, पंकज खवले, पुरुषोत्तम चांदुरकर, योगेश राठी, अविनाश पारस्कर, सचिन पारस्कर, गजानन पारस्कर,शुभम पारस्कर, शिवशंकर देवकर, महादेव पारस्कर, निलेश चांदुरकर, विलास घुळे, निवृत्ती पारस्कर, विनायक पारस्कर, मोहन हरकुट,लालाभाऊ राठी, महेश राठी, किसनराव साटोटे, मोहन पारस्कर,राम पारस्कर, गणेश घुळे, शिवाजी पारस्कर, अनिल कुवारे, सदाशिव पारस्कर,रामकृष्णा घुळे, गजानन खवले, रामकृष्ण मानकर यासह भोटा,रोटी, हिंगणा भोटा येथील गावकरी हजर होते.
यावेळी मनसेने रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्यांना लाॅलीपाॅप देऊन मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button