विभागीय आयुक्तांनी मालेगाव न्यायालयासाठी केली जागेची पाहणी…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.निधी पांण्डेय यांनी मालेगाव पंचायत समितीच्या आवारात असलेल्या सध्याच्या न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन इमारतीचा संपूर्ण परिसर तपासला व मोडकळी झालेल्या इमारतीच्या संदर्भात तात्पुरत्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली आज दिनांक १० जुलै रोजीही परत एकदा पाहणी करण्यात आली मालेगाव न्यायालयासाठी जागा उपलब्ध करण्याच्या बाबतीत विभागीय आयुक्तांनी पुनः पाहणी केली त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी,सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के,जिल्हा न्यायाधीश वाशिम,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,उपजिल्हाधिकारी महसूल विरेंद्र जाधव,तहसीलदार दीपक पुंडे,गटविकास अधिकारी बी.ए.अवगण,नगरपंचायत मुख्य अधिकारी सतीश सेवदा,मालेगाव बार असोसिएशनचे अँड.आशिष गोलेच्छा, अँड.शंकर मगर,अँड.विजय लाहोटी, अँड.राम जोशी,अँड.पवन गट्टानी, अॅड.शिंदे,अॅड.शर्मा,अॅड.सोमाणी, तलाठी धनंजय राऊत व मंडळ अधिकारी नाशेश घुगे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत इमारतीची सविस्तर पाहणी करण्यात आली व त्यावर आवश्यक त्या सुधारणा करण्याचे ठरवले गेले यावेळी,परिसरातील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या इमारती संदर्भातही चर्चा करण्यात आली या निरीक्षण दौऱ्याच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांनी इमारतीची स्थिती तपासून त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.



