सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडचे मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी यांना “बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड” जाहीर !, शिक्षक दिनी मुंबई येथे होणार पुरस्कार वितरण.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि. १० जूलै ; हिवरखेड येथील प्रसिद्ध सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडचे मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी यांना यावर्षीचा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला असून चंद्रकांतजी तिवारी यांनी केलेली प्रचंड मेहनत , समर्पण व शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदाना साठी त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॅा.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसा निमित्त शिक्षक दिनी संपूर्ण भारतातील दीड लाख शाळांपैकी सर्वोत्तम १००० शाळांमधून १००० मुख्याध्यापकांपैकी चंद्रकांतजी तिवारी यांची निवड झालेली असून शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना हा पुरस्कार मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मिळताच पंचक्रोशीतून मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे



