खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र
मुख्यमंत्री केसीआर साहेबांची भेट!

मुख्यमंत्री हे राज्यातील प्रत्येक नागरिकांचे नेते असतात.प्रत्येक नागरिकांचा विचार करून धोरण आखले पाहिजे.कोणी आपली अडचण किंवा निती सांगत असेल तर ती ऐकून घेतली पाहिजे.असा प्रयत्न आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना भेटून सांगण्याचा प्रयत्न केला.पण त्यांनी थेट नागरिकांना भेटणे नाकारले होते.म्हणून आम्ही सरळ राज्यपाल महोदय श्री भगतसिंग कोशीयारी यांची भेट घेतली.नागरिकांना भेट देणे ही राज्यपालांची जबाबदारी नाही तरीही ते आम्हाला भेटले.पंदरा मिनिट जवळ बसवून चर्चा केली.माजी मंत्री खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर घेऊ नये,अशी आमची मागणी होती.ती त्यांनी स्विकारली.आमचे कौतुक केले.यासाठीच आम्ही श्री उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार होतो.पण ते राजपुत्र आणि आम्ही सामान्य प्रजाजन. म्हणून दूर ठेवले.खरे म्हणजे ठाकरेंनी चुकीची नावे राज्यपाल कडे मंजुरीसाठी पाठवली होती.त्यावर आमचा आक्षेप होता.
तेलंगणा चे मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा मधे शेतकऱ्यांसाठी खूप चांगले काम केल्याचे वृत्त भारतात झळकू लागले.एक ही आत्महत्या होऊ दिली नाही.या भव्य दिव्य यशाचे शास्र जाणून घेण्यासाठी आम्ही माजी खासदार श्री हरिभाऊ राठोड यांचे मार्फत भेट मागितली.राठोड साहेबांनी स्वतः बोलून त्यांची वेळ ठरवली.एक मे रोजी महाराष्ट्रातील २३ लोकांना बोलवून राठोड साहेबांनी श्री केसीआर साहेबांशी चर्चा घडवून आणली.आमची उत्सुकता होती कि,असे काय नियोजन केले कि, तेलंगणा मधे शेतकरी आत्महत्या थांबल्या?त्यासाठी स्वतंत्र दौरा व पाहाणी करण्याचे नियोजन केले आहे.महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना तेलंगणा मधे केसीआर साहेबांनी केलेले काम प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवणार आहेत.म्हणाले कि, शेतकरी उत्थान साठी इंग्लंड अमेरिका जाऊन अभ्यास करण्याची गरज नाही.ते येथेच पाहायला मिळेल.असेच काम आम्ही महाराष्ट्र राज्यात करणार आहोत.शेतकऱ्यांनी त्यासाठी आम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे.राजकिय समर्थन दिले पाहिजे.त्या आधी ठराविक लोकांनी तरी तेलंगणा चा विकास पाहून समर्थन द्यावे.म्हणून तेलंगणात येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला आम्ही भेटतो.चर्चा करतो.तशी चर्चा आमची झाली.खूप बरे वाटले.
दोन दिवस राहाण्याची व जेवणाची उत्तम सोय मुख्यमंत्री महोदयांनी लावली होती.त्या निमित्ताने हैदराबाद व सिकंदराबाद शहरात फिरण्याची संधी मिळाली.तेलंगणा स्टेट रिजनल ट्रान्सपोर्टच्या एसटी बसेस ची धावपड पाहुन आम्ही थक्क झालो.एका मागून एक बस शहरात धावत होती.बस आली कि,स्पीकर वर अनौंसमेंट केली जाई कि,ही बस नामपल्ली जात आहे.अमुक अमुक ठिकाणी थांबेल.तेथेच हवे ते तिकीट सुद्धा दिले जाई.त्यामुळे अशिक्षित माणसे महिला,पोरं सुद्धा बस मधे जाऊन बसतात. शिवाय १००रूपयात २४ तास भ्रमणचे तिकीट प्रत्येक वाहक कडे मिळते.
हैदराबाद व सिकंदराबाद शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ बनवले आहेत.त्यावरून पादचारी सुखरूप चालतात.कारणे अपघात नगण्य आहेत.रस्ते पुर्ण चकचकीत आहेत.आधिकतम डांबरी आहेत.असे करणे केसीआर साहेबांना कसे शक्य झाले असेल?त्यांनी स्वताची शेती किंवा घर विकून तर रस्ते बनवले नाहीत?पण ते म्हणतात,सरकारला मिळणारा कर इतका जास्त असतो कि,सर्वच सरकारी कामे करून पैसा शिल्लक उरतो.त्यातूनच विकास सुद्धा करता येतो.हे येथे शिकायला मिळाले.जळगाव चे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, सुरेश भोळे यांना एकदा हैदराबाद व सिकंदराबाद बोट धरून दाखवले पाहिजे.प्रामाणिकपणे काम केल्याचा परिणाम या शहरात जाणवतो.यांनी रस्ता कामाचे कमीशन घेणे बंद केले तर जळगाव मधील रस्ते सुद्धा चकचकीत होतील.सफाई ठेकेदाराकडून कमीशन घेणे बंद केले तर रस्त्यावर एक कचपट सापडणार नाही.पण करोड,अब्ज पैसा जमवूनही हावरटपणा थांबत नसेल तर यांच्या हातात हातमोजे आणि तोंडात कचरा कोंबण्याची वेळ आलेली आहे.अन्यथा हातात बेडी पडेपर्यंत हे थांबणारच नाहीत.
महाराष्ट्रातील राजकीय नाटकबाजी,तोडातोडी,फोडाफोडी,पळवापळवी पाहाता ,आम्हाला ही वाटते कि ,केसीआर पॅटर्न राबवला पाहिजे.शेतकरी आत्महत्या, बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तरी हा पॅटर्न महाराष्ट्रात स्विकारणे आवश्यक झाले आहे.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.



