महाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथील सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

अखिल भारतीय बेलदार समाज संघटनेचे वतीने आयोजित बेलदार समाज सामूहिक विवाह सोहळा ४ मे रोजी उत्साहात पार पडला.

कृष्णार्जीच्या मळ्यात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण भगेवार होते. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले आदी मान्यवरांची प्रमुख

उपस्थिती होती. आर्थिक दुर्बल घटकातील गरजु, गरीब, उपवरवधुंच्या विवाह खर्चामध्ये बचत व्हावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा यासाठी हा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये १२ जोडपी विवाहबद्ध झाली.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते समाजातील उपक्रमशील शेतकरी बाळासाहेब रामचवरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यकमाची सुरवात

ललीता मेंहगे व त्यांच्या समुहाने स्वागत गीताने केली. बेलदार महिला आघाडीच्या माधुरी बगे, वनमाला चौके, लक्ष्मी सैरिशे, सोनाली भगेवार, छाया तलवारे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी योगेश जांभुळकर, सचिन मेहंगे, वैभव बिलेवार, आदित्य बिलेवार, योगेश पाखरे, नंदलाल बिलेवार, राजेश पाखरे, भावलाल इंदोरे, महादेव पाखरे, महादेव मेहंगे, इंद्रजीत बिलेवार आदींनी पुढाकार घेतला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button