बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगांवतीलआनंद सागर येतील भाविकांना आध्यात्मिक केंद्र सुरू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव, संत गजानन महाराज मंदिरामुळे शेगावची ओळख देशभरातच नाही तर जगात आहेत. मंदिरासह आनंद सागर या मनोहारी उद्यानामुळे शेगावने एक मोठे आध्यत्मिक पर्यटन केंद्र असा शेगावचा नावलौकिक मिळविला. परंतु, काही कारणास्तव आनंद सागर गेल्या काही वर्षांपासून बंद होते. त्यामुळे भाविकांसह येथील व्यावसायिकांमध्ये मोठी नाराजी होती.

गेल्या काही दिवसांपासून आनंद सागर पुन्हा एकदा सुरू होणार अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती. आता संत गजानन महाराज संस्थाननेच एका फलकाद्वारे निवेदन देऊन फक्त आध्यत्मिक केंद्र उद्यापासून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

आध्यात्मिक केंद्राचा काही भाग कोविड काळानंतर आहे त्या स्थितीमध्ये

सुरू करण्यात आलेला आहे. केंद्रात प्रवेश निःशुल्क राहणार असून वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील. सायंकाळी ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजित अत्यावश्यक विकासकामे थांबविण्यात आली.

श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर आध्यात्मिक केंद्राची देखभाल-दुरुस्ती, काही भागाचे पुनर्निर्माण व पुढील विकास कार्ये हाती घेण्यात येतील.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button