बुलढाणामहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी संग्रामपूर मंडळ च्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६”अंतर्गत भव्य निवासी शिबिर यशस्वी रित्या व अत्यंत उत्साहात व प्रभावीपणे पार पडले….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ६ एप्रिल २०२६
दि 04/04/26 ते 05/04/26 दरम्यान आयोजित या २४ तासांच्या शिबिराची सुरुवात सायंकाळी ५.०० वाजता झाली व समारोप दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजता करण्यात आला.कार्यकाचे उद्घाटन भा ज पा खामगाव जिल्हाअध्यक्ष मा श्री सचिन बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र”या गीताने झाली व शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.संपूर्ण शिबिरामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्कृष्ट शिस्त, नियोजन व व्यवस्थापनाचे दर्शन घडले.सहभागी कार्यकर्त्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची अत्यंत उत्तम व वेळेवर व्यवस्था करण्यात आली होती.प्रत्येक घटकाचे काटेकोर नियोज केल्यामुळे शिबिराचे व्यवस्थापन कौशल्य अधोरेखित झाले.शिबिरादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन, सकाळी व्यायाम तसेच संध्याकाळी भजन-कीर्तन कार्यक्रमांमुळे वातावरण सकारात्मक, ऊर्जावान व प्रेरणादायी राहिले.यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकात्मता व उत्साह अधिक दृढ झाला.
या शिबिरात विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांनी सखोल व मार्गदर्शक विचार मांडले.या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी,पक्षाची विचारधारा, विविध शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली.या कार्यक्रमामध्ये भा ज पा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लोकप्रिय आमदार माननीय डॉ श्री संजय जी कुटे साहेब हे स्वतःउपस्थित राहून संपूर्ण शिबिराला पूर्ण वेळ दिला.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळाली.सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानत मंडल अध्यक्ष यांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिबिराचा समारोप केला.याभव्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संग्रामपूर तालुक्यातील संपूर्ण तालुका व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते,सर्व मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रभावी नियोजन करत अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध उपस्थिती व समर्पण या शिबिराची खास वैशिष्ट्ये ठरली……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button