नोकरी विशेषबुलढाणामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश! मानधनात

अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश! मानधनात वाढ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव । राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील १६ जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे.सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीरकरण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार, मात्र त्यात कर्मचाऱ्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.दरम्यान, मानधन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अशामागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून संप सुरु केला होता. आज सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button